कोकण रेल्वेमार्गावरील गाड्या १ मेपासून विजेवर धावणार
सावंतवाडी – कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आता पूर्ण झाले असून १ मे २०२२ पासून रेल्वेगाड्या विजेच्या इंजिनवर धावणार आहेत. त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास जलद आणि प्रदूषणविरहित होईल, असा विश्वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.
पहिल्या टप्प्यात विजेच्या इंजिनवर धावणार्या १० गाड्या सोडण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने डिझेलवर धावणार्या सर्व गाड्या विजेवर चालू करण्यात येणार आहेत. ‘मार्गावर धावणार्या सर्व गाड्या विजेवर धावू लागल्यावर तब्बल १५० कोटी रुपयांची बचत होईल’, असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.