शेंदुर्णी (जिल्हा जळगाव) नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून केवळ भगवे झेंडे हटवतांना पदाधिकाऱ्यांनी रोखले !
मोर्च्याद्वारे मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी !
जळगाव, २४ एप्रिल (वार्ता.) – शेंदुर्णी गावात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजीद पिंजारी यांनी गावातील सर्वच झेंडे आणि फलक काढण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश दिले. त्यानंतर कर्मचारी केवळ भगवे झेंडे काढत होते. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी भगवे झेंडे काढणे रोखले. (हिंदु धर्मावरील आघात वेळीच रोखणाऱ्या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! – संपादक)
पदाधिकारी आणि हिंदू यांनी मुख्याधिकारी पिंजारी यांच्यामुळे गावातील जातीय सलोखा धोक्यात आल्याचा आरोप करत त्यांच्या निषेधार्थ २२ एप्रिलला नगरपंचायतीवर मोर्चा काढला. या वेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना निवेदन देत पिंजारी यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली.
(म्हणे) ‘कुठले झेंडे कर्मचाऱ्यांनी काढले माहीत नाही !’ – साजीद पिंजारी, मुख्याधिकारी
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतांना शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजीद पिंजारी म्हणाले की, विनाअनुमती लावलेले ध्वज, फलक काढण्याचे पोलीस अधीक्षक यांचे पत्र होते. कर्मचाऱ्यांनी कुठले झेंडे काढले याविषयी माहिती नाही. आदेशाप्रमाणे कार्यवाही केली. (येथे केवळ भगवे ध्वज कसे काढले गेले ? कर्मचाऱ्यांना तसे सांगण्यात आले होते का ? याचा शोध घेतला पाहिजे. कर्मचारी सांगितल्यानुसार कारवाई करतात, असेच सहसा होते आणि तसे झाले नसेल, तर कर्मचाऱ्यांनी काय कारवाई केली, हे पहाणे मुख्याधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|