हिंदूंवर पक्षपाती कारवाई !
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे धर्मांधांनी हिरवे झेंडे लावल्यानंतर त्यावर हिंदूंनी आक्षेप घेतला नव्हता; मात्र याच वेळी भगवा झेंडा लावल्यानंतर धर्मांधांनी त्याला आक्षेप घेऊन शहरात दंगल घडवली. अचलपूर येथील दुन्हा प्रवेशद्वारावर लावलेला भगवा झेंडा काढण्यासाठी तालिबानी प्रवृत्तीच्या संघटित जमावाने आतंकवादी कृत्य केले. त्यामुळे ‘हा पूर्वनियोजित कट आहे’, असेच म्हणता येऊ शकते. धर्मांधांनी सामाजिक वातावरण बिघडवल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून पक्षपाती कारवाई चालू झाली.
ज्या हिंदु तरुणांचा या घटनेशी सूतराम संबंध नव्हता, त्यांनाच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बळजोरीने अटक केली. ही घटना घडली, त्या वेळी भाजपचे अचलपूर शहराध्यक्ष अभय माथने हे पुणे येथे स्वतःच्या मुलीला सोडण्यासाठी पत्नीसह गेले होते. त्यांनाही पोलिसांनी अटक केली. खरेतर अचलपूर येथे २ सहस्र धर्मांधांनी हैदोस घातला होता. त्यांच्यातील बोटावर मोजता येईल एवढ्याच लोकांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. हा पक्षपात नव्हे का ? या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करूनही जिल्हाधिकारी नवनीत कौर यांनी त्याची नोंद घेतली नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारली. यावरून ‘प्रशासकीय अधिकारी पक्षपातीपणाने वागतात’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? २ मासांपूर्वी अमरावती, मालेगाव, नांदेड यांसह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या दंगली या सुनियोजित होत्या, हेही अन्वेषणातून समोर येत आहे.
सामाजिक माध्यमांचा उपयोग करून दंगल घडवण्याचा देशद्रोही रझा अकादमीचा प्रयोग होता. एका दिवसात ४० सहस्र धर्मांध एकत्र येऊन मोर्चा झाल्यावर मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या दुकानांची तोडफोड केली. यावरून रझा अकादमीला दंगल घडवायची होती, हे सिद्ध झालेले असतांनाही पोलिसांनी रझा अकादमीवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट हिंदूंवरच कारवाई करण्यात आली. वास्तविक कुठेही अल्पसंख्यांकांच्या धार्मिक भावना दुखावल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक असे मोठे अधिकारी अल्पसंख्यांकांचे सांत्वन करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात; पण हिंदूंवर तत्परतेने जाणीवपूर्वक कारवाई केली जाते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे स्वतःवरील अन्याय रोखण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणेच अपरिहार्य आहे.
– श्री. सचिन कौलकर, मुंबई.