‘सनातन प्रभात’ने ‘युद्ध विशेषांका’द्वारे हिंदु राष्ट्रासाठी आपली सेवा राष्ट्राच्या चरणी केली समर्पित ! – विद्याधरपंत नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडमध्ये असतांना शिखांचा इतिहास लिहिला होता; परंतु नियतीच्या मनात नसल्यामुळे तो प्रसिद्ध होऊ शकला नाही. काळाच्या उदरात तो गडप झाला. याचे शल्य आपल्या पंतप्रधानांच्या मनात असावे; म्हणून त्यांनी गुरु तेग बहादूरजी यांच्या जयंतीचे निमित्त साधून देहलीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून हिंदुस्थानच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा दिला. त्याचप्रमाणे ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राने २३ एप्रिल या दिवशी ‘युद्ध विशेषांक’ प्रसिद्ध करून हिंदु राष्ट्रासाठी आपली सेवा राष्ट्राच्या चरणी समर्पित केली. यासाठी पंतप्रधान आणि ‘सनातन प्रभात’ यांचे मनापासून अभिनंदन ! ‘त्यांना असेच यश मिळो’, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
।। जय जय रघुवीर समर्थ।।