हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या नावाने भेट घेणाऱ्या आणि संशयास्पद वर्तन असणाऱ्या व्यक्तीपासून सावध रहा अन् ही माहिती त्वरित समितीला कळवा !
हिंदु जनजागृती समितीकडून नम्र आवाहन !
स्वत: हिंदुत्वनिष्ठ असल्याचे सांगून महाराष्ट्रात एक व्यक्ती स्वत:च्या जिल्ह्याबाहेरील एका जिल्ह्यात अन्य एका संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना भेटली. ही भेट घेतांना स्वत: हिंदुत्वनिष्ठ असल्याचे सांगणाऱ्या या व्यक्तीने त्या जिल्ह्यातील ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी तुमचा संपर्क क्रमांक दिला आणि म्हणून मी भेटायला आलो,’ असे सांगितले. ‘संपर्क क्रमांक कुणी दिला,’ असे स्थानिक कार्यकर्त्यांनी विचारले असता या कथित हिंदुत्वनिष्ठास समितीच्या कार्यकर्त्याचे नेमके नाव सांगता आले नाही. ही संशयास्पद व्यक्ती हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटणार असल्याची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती; ते येऊन गेल्याचे स्थानिक संघटनेकडून नंतर समितीच्या कार्यकर्त्यांना कळले.
हिंदु जनजागृती समिती नेहमी सनदशीर मार्गाने कार्य करत असल्याचे स्थानिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना ठाऊक असल्याने कथित हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती आक्रमकपणे बोलत असल्याचे पाहून, ते स्थानिक कार्यकर्त्यांना खटकले. या कथित हिंदुत्वनिष्ठाच्या चारचाकीत ‘पोलीस’ आणि ‘पत्रकार’ अशा वाहनावर लावायच्या २ पाट्या कार्यकर्त्यांना दिसल्या.
हितचिंतकांना विनंती !
अशा प्रकारे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा संदर्भ देऊन कुणी संशयास्पद वर्तन करत असल्यास कृपया आपल्या परिचयातील समितीच्या कार्यकर्त्यांना त्वरित संपर्क साधावा.