हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील पोलीस ठाण्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी ए.आय.एम्.आय.एम्.च्या नगरसेवकाला अटक
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथे हनुमान जयंतीच्या दिवशी सामाजिक माध्यमांतून कथित आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्यावरून धर्मांधांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे) नेते आणि नगरसेवक नजीर अहमद होनवाल यांना अटक केली. यापूर्वीच याच प्रकरणात या पक्षाच्या नगरसेविका हुसैनबी नलवतवाड यांचे पती इरफान नलवतवाड यांना अटक करण्यात झाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १३४ जणांना अटक करण्यात आली आहे.
Hubballi | Karnataka Police arrested AIMIM corporator Nazir Ahmed Honyal today, in connection with the stone-pelting incident at Old Hubli Police Station. pic.twitter.com/Y6kD34JF7l
— ANI (@ANI) April 23, 2022
संपादकीय भूमिका
अशा राष्ट्रघातकी पक्षावर बंदी घालण्याची मागणी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी का करत नाहीत ?