कोरोनाच्या काळात माझ्या उपचारांचे देयक मीच भरले !- अजित पवार, उपमुख्यमंत्री
पुणे – मला कोरोना झाला होता, त्या वेळी उपचारांचा व्यय मी स्वत: केला होता. ज्यांनी खासगी रुग्णालयातील देयके सरकारकडे लावली आहेत, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. स्वत:चा पैसा व्यय करण्याऐवजी सरकारचा पैसा का घेतला ? अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या काळात सरकारमधील मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन कोट्यवधींची देयके सरकारी तिजोरीतून भरली याविषयी त्यांना प्रश्न विचारला असता ते बोलत होते.