जागतिक निर्बंधांमुळे रशियामध्ये महागाईत प्रचंड वाढ
आस्थापने बंद झाल्याने २ लाख लोक बेरोजगार
नवी देहली – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक समुदायाने रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. आंतरराष्ट्रीय निर्बंधांची झळ बसू नये, यासाठी रशियाकडून उपाययोजनादेखील काढण्यात आली असली, तरी त्याला आता निर्बंधांचे परिणाम जाणवू लागले आहेत.
१. रशियातील काही आस्थापने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. देशातील परकीय आस्थापनांनी कामकाज बंद झाल्याने २ लाख लोकांच्या नोकर्या गेल्याचे माहिती मॉस्कोच्या महापौरांनी दिली. रशियामध्ये दूध, भाज्या, साखर इत्यादी वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
२. रशियाला गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक महागाईचा सामना करावा लागत आहेत. महागाईचा दर २००२ नंतर प्रथमच १७.३ टक्क्यांवर पोचला आहे.