प्रियांका वाड्रा यांनी मला म.फि. हुसेन यांनी राजीव गांधी यांचे काढलेले चित्र २ कोटी रुपयांना विकत घेण्यास भाग पाडले !
‘येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांचा ‘ईडी’कडे जबाब
चित्राच्या बदल्यात दिले पद्म पुरस्कार देण्याचे आश्वसान !
मुंबई – काँग्रेसच्या नेत्या प्रियांका वाड्रा यांनी हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी दिवंगत राजीव गांधी यांचे काढलेले एक चित्र विकत घेण्यास मला भाग पाडले होते. त्या बदल्यात त्यांनी मला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचे वचन दिले होते. हा सौदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन पेट्रोलियममंत्री मुरली देवरा यांनी केला होता, असा आरोप ‘येस बँके’चे संस्थापक राणा कपूर यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (‘ईडी’ला) दिलेल्या जबाबात केला. ९ आणि १० मार्च २०२० या दिवशी या जबाब नोंदवण्यात आला होता. ईडीने नुकतेच येस बँकेच्या अधिकार्यांविरुद्ध पुवणी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
१. आरोपपत्रानुसार राणा कपूर यांनी सांगितले, ‘हे चित्र खरेदी केल्यानंतर काही आठवड्यांनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार दिवंगत अहमद पटेल यांनी माझ्या ‘चांगल्या कामाचे’ कौतुकही केले होते. ‘सर्वोच्च नागरी सन्मानासाठी माझा योग्य विचार केला जाईल’, असे सांगितले होते. या सौद्यासाठीची पैशांची घेवाण आणि चित्र सोपवण्याचे काम प्रियांका वाड्रा यांच्या नवी देहलीतील कार्यालयात झाले होते. या वेळी प्रियांका वाड्रा याही उपस्थित होत्या.’
२. ‘ईडी’ने डिसेंबर २०१९ मध्ये राणा कपूर, त्यांची पत्नी, मुली, ‘दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपोर्रेशन लिमिटेड’चे प्रवर्तक कपिल वाधवान आणि येस बँकेच्या अधिकार्यांविरुद्ध लक्ष्मणपुरी पोलिसांनी नोंदवलेल्या फसवणुकीच्या प्रकरणाच्या आधारे आर्थिक गैरव्यवहराची कारवाई केली होती.
सौजन्य : साम
संपादकिय भुमिका
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे धाडस ‘ईडी’ने दाखवले पाहिजे !