अलवर (राजस्थान) येथील ३०० वर्षे जुन्या शिवमंदिरासह ३ मंदिरे प्रशासन पुन्हा बांधणार !
अलवर (राजस्थान) – अलवर जिल्ह्यातील राजगड येथे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाडण्यात आलेले ३०० वर्षे जुन्या शिवमंदिरासह ३ मंदिरे पुन्हा बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती राजगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनीत पंकज यांनी दिली आहे. पंकज म्हणाले की, मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. जनतेला जेथे वाटेल, तेथे ही मंदिरे बांधण्यात येतील. वादग्रस्त नसलेल्या भूमींवर ही मंदिरे बांधली जातील.