पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई येथे ‘लता मंगेशकर’ पुरस्काराने गौरव !

मुंबई – पुणे येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पहिला ‘लता मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित करण्यात आला आहे. २४ एप्रिल या दिवशी श्री षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित असणार आहेत.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उषा मंगेशकर या असतील. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संगीत, नाटक, कला, वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक या क्षेत्रातील मान्यवरांना प्रतीवर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी संगीतकार राहुल देशपांडे, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता जॅकी श्रॉफ, समाजसेवा क्षेत्रातील मुंबईचे डबेवाले आणि नाट्यक्षेत्रातील संज्या छाया या मान्यवरांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.