‘सनातन प्रभात’ नियतकालिके लवकरच येणार ‘ई-पेपर’च्या स्वरूपात !
आम्हाला हे सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ऑनलाईन आवृत्त्या लवकरच डिजिटल न्यूजपेपर अर्थात् ‘ई-पेपर’च्या स्वरूपात प्रसिद्ध होणार आहेत. यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या महाराष्ट्र अन् गोवा या राज्यांतील ‘मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ’, ‘पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा’, ‘रत्नागिरी’ आणि ‘गोवा-सिंधुदुर्ग’ या चार आवृत्त्या यांच्या प्रत्यक्ष वितरणासमवेतच त्या ‘ई-पेपर’च्या स्वरूपातही वाचकांना भ्रमणभाष, तसेच संगणक यांच्यावर वाचायला मिळणार आहेत. ‘सनातन प्रभात’चे मराठी आणि कन्नड साप्ताहिक, तसेच हिंदी आणि इंग्रजी पाक्षिक हेही ‘ई-पेपर’ स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध असेल.
यामुळे कोरोना महामारी असो कि बस संप किंवा आगामी तिसरे महायुद्ध असो, ‘सनातन प्रभात’च्या प्रत्यक्ष वितरणावर जरी काही अंशी परिणाम झाला, तरी ‘सनातन प्रभात’ ई-पेपरच्या रूपात सर्वांना वाचायला मिळेल. यासंदर्भातील विस्तृत माहिती लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
– संपादक, सनातन प्रभात नियतकालिके