‘पी.एफ.आय.’वर गोव्यात बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री, गोवा

नवी देहली – कट्टर जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (‘पी.एफ.आय.’वर) बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यापूर्वी गोव्यात धर्मांतर करण्याच्या घटना वाढत असल्याचे म्हटले होते. गरीब, मागासलेला, भुकेलेला, बेरोजगार आदी व्यक्तींच्या परिस्थितीचा अपलाभ उठवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचे; मात्र राज्यातील भाजप सरकार असे धर्मांतर होऊ देणार नसल्याचे डॉ. सावंत यांनी म्हटले होते.

डॉ. सावंत यांच्या या विधानावर ‘पी.एफ.आय.’ने टीका केली होती. या टीकेला उत्तर देतांना डॉ. सावंत म्हणाले, ‘‘धर्मांतराला थारा न देण्याच्या माझ्या विधानाला ‘पी.एफ.आय.’ने केलेला विरोध चुकीचा आहे. वाढत्या धर्मांतराला आमचा विरोध कायम रहाणार आहे. गोवा सरकार राज्यात धर्मांतराला थारा देणार नाही. ‘पी.एफ.आय.’वर गोव्यात बंदी घातली पाहिजे आणि तशी शिफारस केंद्रशासनाकडे करण्यात येणार आहे.’’

संपादकीय भूमिका

  • जिहादी ‘पी.एफ.आय.’वर बंदी घालण्याची मागणी करणारे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन ! खरेतर आतापर्यंत केंद्र सरकारनेच ‘पी.एफ.आय.’च्या मुसक्या आवळायला हव्या होत्या !

  • ‘पी.एफ.आय.’वर केवळ गोव्यातच नव्हे, तर देशभरात बंदी घातली पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !