केशरचना करतांना स्त्रियांनी स्वत:च्या केसांचा भांग मध्यभागी पाडून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यावा !
स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी खालील छायाचित्रे पहावीत.
काही स्त्रिया केसांचा भांग मधोमध न पाडता तो उजव्या किंवा डाव्या बाजूला पाडतात. (छायाचित्र १) काही स्त्रिया आकर्षक केशरचनेसाठी काही अंतरापर्यंत सरळ भांग पाडतात आणि नंतर भांगाची दिशा पालटतात. (छायाचित्र २) काही वेळा केसांचा भांग व्यवस्थित आणि मधोमध न पाडल्याने तो शेवटी सरळ रेषेत न रहाता तिरका होतो. अशा प्रकारे भांग पाडून केशरचना केल्यामुळे स्त्रियांमधील रज-तम गुण वाढतात अन् स्त्रियांवर त्रासदायक (काळ्या) शक्तींचे आवरण येते. काही वेळा स्त्रिया वाईट शक्तींच्या आक्रमणालाही बळी
पडू शकतात.
हिंदु धर्माने प्राचीन काळापासून सात्त्विक केशरचना करण्यास शिकवले आहे. मधोमध भांग पाडून सात्त्विक केशरचना केलेल्या व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ तर होतोच, याव्यतिरिक्त त्या केशरचनेतून सात्त्विक लहरी प्रक्षेपित झाल्याने ती केशरचना पहाणाऱ्याच्या मनावरही चांगला परिणाम होतोे. (छायाचित्र ३)
स्त्रियांनी केशरचना करतांना केसांचा भांग मध्यभागी पाडल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावर पुढील लाभ होऊ शकतात.
१. ईश्वरी चैतन्य ग्रहण होऊन सहस्रारावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होणे.
२. ईश्वरी चैतन्य ग्रहण झाल्याने कुंडलिनीचक्र जागृत होण्यास साहाय्य होणे.
३. ईश्वरी चैतन्यामुळे अंतर्मुखता निर्माण होणे.
त्यामुळे स्त्रियांनी केवळ बाह्य सौंदर्याचा विचार न करता स्वत:च्या केशरचनेचा आध्यात्मिक स्तरावर विचार करावा. ‘केसांचा भांग मध्यभागी पाडणे’, हे आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक असल्याने स्त्रियांनी केसांचा मधून भांग पाडावा. केसांचा भांग सात्त्विक स्पंदनांच्या दृष्टीने ‘मध्यभागी आणि सरळ रेषेत शेवटपर्यंत येईल’, असे पहावे.
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२२)
अधिक माहितीसाठी सनातनचा ‘केशरचना कशी असावी ?’ हा ग्रंथ वाचावा.सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७ |
|