एस्.एस्.आर्.एफ.च्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. एस्.एस्.आर्.एफ. फेसबूक (इंग्रजी)

अ. ‘एस्.एस्.आर्.एफ.’च्या संकेतस्थळावरील लेखांमुळे मला पुष्कळ प्रेरणा मिळाली. ‘माझा परम प्रिय ‘गोविंदा’ माझे सर्व ऐकतो’, असे मला वाटते. माझा त्याच्याप्रती भाव वाढत आहे. याचे कारण तुम्ही मार्गदर्शन केल्यानुसार मी माझ्या अयोग्य सवयी न्यून करून माझ्यासाठी जे आवश्यक आहे, ते आत्मसात करण्यास आरंभ केला आहे. हे नियमित अन् भावपूर्ण नामजप केल्याने साध्य होणार आहे.’ – श्रीमती पॅट्रिसिया काझोव्हा

२. एस्.एस्.आर्.एफ. लाइव्ह चॅट

अ. ‘एस्.एस्.आर्.एफ.च्या गुरूंप्रती मला कृतज्ञता वाटते. मी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करण्यास आरंभ केल्यापासून माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून झाले आहेत.’ – एक जिज्ञासू, घाना

आ. ‘मला स्वयंपाकघरातील कामे करायला जराही आवडत नसे. त्यामुळे मला स्वयंपाक बनवण्यात रुची निर्माण होण्यासाठी मी स्वयंसूचना घेतल्या. केवळ एक दिवस स्वयंसूचना घेऊनही माझा तोंडवळा तेजस्वी दिसू लागला आहे आणि माझ्या मुखावर हास्य आले आहे. ‘माझ्यात पुष्कळ स्वभावदोष आहेत’, याची मला जाणीव झाली आहे.’ – एक जिज्ञासू महिला, भारत

(सर्व सूत्रांचा दिनांक जानेवारी २०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक