भारताने सक्रीयतेने साहाय्य करण्याचे युक्रेनचे आवाहन !
कीव (युक्रेन) – युक्रेनचे संस्कृती आणि सूचना मंत्री ओलेक्सांद्र त्काचेंको यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला सक्रीयतेने साहाय्य करण्याची भारताकडे मागणी केली आहे. ते म्हणाले, ‘‘भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. युक्रेनचे नागरिक लोकशाहीच्या ज्या मूल्यांसाठी लढत आहेत, तीच मूल्ये भारतीय नागरिकही जपतात. भारताने युक्रेनला साहाय्य केल्यास मी भारताचा पुष्कळ आभारी राहीन.’’ गेल्या अडीच मासांपासून चालू असलेल्या युद्धाच्या संदर्भात भारताने तटस्थ भूमिका घेतल्याने त्काचेंको यांनी भारताचे साहाय्य मिळण्यासाठी आग्रह धरला आहे.
या वेळी त्यांनी पश्चिमी देशांनाही आवाहन केले आहे की, त्यांनी रशियन तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या आयातीवर वास्तविक रूपाने प्रतिबंध घालावा. त्काचेंको पुढे म्हणाले की, युक्रेनच्या विरोधातील कारवाईची तुलना ॲडॉल्फ हिटलरशी करता येईल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा युक्रेनवर संपूर्ण नियंत्रण मिळवून त्याची ओळख नष्ट करण्याचा हेतू आहे