महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्यांचा शिरच्छेद करण्याची घोषणा !
हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – सामाजिक माध्यमांतून सध्या एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. हा व्हिडिओ हुब्बळ्ळी येथील असल्याचे सांगितले जात आहे. यात काँग्रेसचे हुब्बळ्ळी जिल्हाध्यक्ष अल्ताफ हल्लर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जमावाकडून पोलीस ठाण्याच्या बाहेर ‘गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा’ (महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्यांना एक शिक्षा, म्हणजे शिरच्छेद) अशा घोषणा देण्यत येत आहे. या जमावाचे नेतृत्व एक मौलाना (इस्लामी विद्वान) करत असल्याचे दिसत आहे. त्यांना रोखणार्या पोलिसांना जीव मारण्याची धमकीही दिली जात आहे.
Hubbali: Maulana delivered provocative speech standing atop police commissioner’s car along with Congress leader, enraged mob attacked police station, temple
He had demanded to hand over the person who had allegedly made a derogatory speech against Islamhttps://t.co/fJ9EvQ8aWC
— OpIndia.com (@OpIndia_com) April 19, 2022
श्रीरामनवमीच्या दिवशी सामाजिक माध्यमांवरील पोस्टवरून धर्मांधांनी तोडफोड केली होती, तसेच पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. यात १२ जण घायाळ झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली आहे. हा व्हिडिओ तेव्हाचा असल्याचे म्हटले जात आहे.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे कायदा हातात घेण्याची घोषणा देणार्यांवर भाजप सरकारने कठोर कारवाई करावी ! अशा घोषणांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी बोलले पाहिजे ! |