‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्या तिघा धर्मांधांना अटक
गिरिडीह (झारखंड) येथे सरपंच पदासाठी उमेदवारीअर्ज भरतांना घडला प्रकार
गिरिडीह (झारखंड) – येथील पंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरतांना महंमद शाकिर याच्या समर्थकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी शाकिर याच्यासह तिघांना अटक केली. या घोषणाबाजीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. (जर व्हिडिओ प्रसारित झाला नसता, तर पोलिसांना असे काहीतरी घडले आहे हे कळलेच नसते ! असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी राखत असतील, असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक)
सौजन्य जागो भारत
संपादकीय भूमिका
|