राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ब्राह्मणविरोधी ! – नितेश राणे, आमदार, भाजप
कणकवली – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे मानधन घेऊन व्याख्यान देतात. ब्राह्मणांविषयी ते जे बोलले, ही त्यांची भूमिका होती कि अन्य कुणी त्यांना बोलायला लावले ? मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे प्रोत्साहन देतात. आता मिटकरी हे ‘क्षमा मागणार नाही’, असे म्हणतात. या मागे कोण आहे ? हे पाहिले पाहिजे. आमदार मिटकरी ब्राह्मण समाजाच्या विरोधात बोलले, ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच भूमिका आहे. आमदार मिटकरी हे आता केवळ व्याख्यानापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अधिकृत आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही ब्राह्मणविरोधी आहे, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.