#Boycott_MalabarGold नावाचा ट्विटर ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर ५ व्या स्थानी !

#Boycott_MalabarGold आणि #No_Bindi_No_Business

मुंबई – ‘मलबार गोल्ड’च्या विज्ञापनाच्या विरोधात #Boycott_MalabarGold आणि #No_Bindi_No_Business या नावांनी ट्विटरद्वारे हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. या ट्रेंड्सच्या माध्यमातून धर्मप्रेमी हिंदूंनी ‘मलबार गोल्ड’चा निषेध करत त्यावर बहिष्कार टाकण्याचे हिंदूंना आवाहन केले. या ट्रेंडला व्यापक पाठिंबा मिळून दोन्ही हॅशटॅग राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे ५ व्या आणि ६ व्या स्थानांवर होते. या विषयावर २५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.

मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या काही लक्षवेधी ट्वीट्स !

१. ‘मलबार गोल्ड’ आस्थापनाने हे लक्षात ठेवावे की, अक्षय्य तृतीया हा हिंदूंचा सण आहे. त्याने रमझानसारखा त्याचा प्रचार करू नये !’ – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

२. ‘मलबार गोल्ड’चे हे विज्ञापन हिंदूंच्या सणांचा अवमान करणारे आहे. कुंकू लावणे हा पारंपरिक हिंदु वेशभूषेतील महत्त्वपूर्ण भाग आहे. हिंदूंच्या परंपरांचे हसे करणार्‍यांवर हिंदूंनी त्यांचे पैसे खर्च करावेत ? हे कदापि होऊ शकत नाही !’ – अपर्णा नाईक, हिंदुत्वनिष्ठ

३. ‘हिंदूंच्या परंपरांचा आदर करणार्‍यांच्या समवेतच आपण व्यवहार करण्याचा निश्‍चय करूयात !’ – ‘हिंदु जनजागृती समिती’चे अधिकृत ट्विटर खाते

४. ‘हिंदूंसाठी कुंकवाला एका लाल ठिपक्याहूनही पुष्कळ अधिक महत्त्व आहे. जर ‘मलबार गोल्ड’सारखी आस्थापने हे समजू शकत नसतील किंवा मुद्दामहून त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर हिंदूंनी त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची हीच वेळ आहे !’ – ‘सनातन प्रभात कन्नड’चे अधिकृत ट्विटर खाते