तमिळनाडूमध्ये हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती शिक्षकाचा दबाव !
|
तिरुपूर (तामिळनाडू) – येथील एका शाळेतील ६ व्या इयत्तेत शिकणार्या एका हिंदु विद्यार्थिनीच्या पालकांनी तिच्यावर ख्रिस्ती शिक्षकांनी ख्रिस्ती धर्मात स्वीकारण्यास दबाव आणल्याच्या कारणावरून शिक्षिकांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘जयाबाई म्युनिसिपल गर्ल्स हायर सेकंडरी स्कूल’ नावाची ही शाळा सरकारी अनुदानावर चालते. हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने या संबंधीचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये पीडित विद्यार्थिनीवर झालेल्या अन्यायाचे ती स्वत: कथन करत असल्याचे दिसत आहे.
१. पालकांनी केलेल्या या तक्रारीचे अन्वेषण केले जात असल्याचे पोलीस अधिकार्यांनी सांगितले आहे. या घटनेवरून ‘हिंदु मुन्नानी’ संघटनेचे सचिव सेंथिल कुमार म्हणाले, ‘‘तामिळनाडूच्या सर्व शाळांमध्ये हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. सरकारी शिक्षण विभाग काय करत आहे ? जर या प्रकरणी योग्य कारवाई करण्यात आली नाही, तर लोकांचा भडका उडेल !’’
२. गेल्याच आठवड्यात कन्याकुमारीतही एका ख्रिस्ती शिक्षकावर हिंदूंच्या देवतांचा अपमान करणे आणि विद्यार्थ्यांकडून ख्रिस्ती धर्मानुसार प्रार्थना करून घेण्याचा दबाव बनवल्याबद्दल तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती.
३. जानेवारी मासात राज्यातील तांजावूरमध्ये ‘सेक्रेड हार्ट हायर सेकेंडरी स्कूल’मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा दबाव बनवल्यावरून बारावी इयत्तेत असलेल्या ‘लावण्या’ नावाच्या हिंदु मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
|
हिंदु विद्यार्थिनीने दिलेली धक्कादायक माहिती !१. एकदा विद्यार्थिनीला परिक्षेत कमी गुण मिळाल्याने शिक्षकाने तिला ‘पट्टाई लावणारी गाढव’ म्हणत हिणवले. |