जालौन (उत्तरप्रदेश) येथे मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण केल्याने मंदिराच्या पुजार्याच्या विरोधात गुन्हा नोंद !
पुजार्याकडून पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ आमरण उपोषण
जालौन (उत्तरप्रदेश) – येथील तुलसीनगरमध्ये मशिदीवरील भोंग्यांवरून अजान ऐकली जात असतांना मंदिराचे पुजारी मत्स्येंद्र गोस्वामी यांनी मशिदीच्या समोर हनुमान चालिसा म्हटल्याने त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला. यामुळे अप्रसन्न झालेल्या गोस्वामी यांनी पोलिसांचा विरोध करण्यासाठी आमरण उपोषण चालू केले आहे. ‘पोलिसांची चुकीच्या माहितीच्या आधारे माझ्यावर कारवाई केली आहे. या मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पारायण ठेवण्यात आले होते. त्या वेळी भोंग्यांचा वापर करण्यात आला नव्हता’, असे गोस्वामी यांचे म्हणणे आहे. पुजारी गोस्वामी यांनी या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे.
|