धर्म-अधर्माच्या युद्धात धर्माचा जय होतो !
महाभारताच्या युद्धात सर्वनाश होणार, हे भगवान श्रीकृष्णाला ठाऊक होते, त्याने शेवटपर्यंत ते टाळण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेर त्याने युद्धाचा निर्णय घेतला, कारण युद्धाला पर्याय नव्हता. तसेच पाकपुरस्कृत आतंकवाद आणि भारतातील शांतता यांकडे पहाता भारताला अशा आरपारच्या युद्धाला पर्याय आज ना उद्या नसेल. एखाद्या रोगावर उपचार करतांना ‘त्या रोगाचे जंतू संपूर्ण नष्ट केल्याविना तो आजार बरा होत नाही’, तसेच पाकचा सर्वनाश केल्याविना भारतात शांतता निर्माण होऊ शकत नाही. पाकच्या विनाशामुळे भारतातील धर्मांधांचीही वळवळ नष्ट होईल किंवा नाही झाली, तरी ती ठेचून काढण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे अशा वेळी आणखी स्वतःची हानी करून घेण्यापेक्षा पाकच्या विरोधात आताच कारवाई करून याचा सोक्षमोक्ष लावावा लागणार, हे लक्षात घेतले पाहिजे.
काँग्रेसींच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी इच्छाशक्ती दाखवू शकतात, यावर भारतियांना विश्वास वाटतो. २ सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी आतंकवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले आहेत. काश्मीरमध्ये ३७० कलम हटवूनही अद्याप आतंकवाद्यांचा धुमाकूळ चालूच आहे. त्यामुळे पाकला कायमस्वरूपी धडा शिकवण्यासाठी आज ना उद्या काही ना काही उपाययोजना ही करावी लागणारच आहे. संत आणि भविष्यवेत्ते यांनी सांगितल्यानुसार तिसरे महायुद्ध होणार आहे आणि त्यात अधर्माचा विनाश होणारच आहे !
– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.