(म्हणे) ‘भारत मुसलमानांच्या नरसंहारामध्ये सहभागी !’
पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांचा फुकाचा आरोप
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत मुसलमानांचा नरसंहार करत असून त्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे, असा फुकाचा आरोप पाकचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनी केला आहे. पाकिस्तानच्या भेटीवर असणार्या अमेरिकेच्या महिला खासदार अल्हान उमर यांच्याशी बोलतांना राष्ट्रपती अल्वी यांनी हा आरोप केला. ‘मोदी सरकार सत्तेत असणार्या भारतात अल्पसंख्यांक विशेषतः मुसलमानांवर अत्याचार केले जात आहेत’, असेही राष्ट्रपती अल्वी यांनी म्हटले.
He said that the world must be made aware of the suppression and possible Muslim genocide in India.
He added that US and Pakistan need to come closer.
Ms. Omar also appreciated Pakistan’s role in the Islamophobia resolution of the UN.
— The President of Pakistan (@PresOfPakistan) April 20, 2022
संपादकीय भूमिकायाला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अन्य धर्मीय यांचा नरसंहार चालूच आहे. पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आणि १ टक्केच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत, हे डॉ. अल्वी का सांगत नाहीत ! |