नगर येथे हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांचे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान पार पडले !

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता, धर्मप्रेमी यांनी केला हिंदुराष्ट्रासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी हिंदु राष्ट्र संपर्क दौर्‍याच्या अंतर्गत नगर येथील हिंदुत्वनिष्ठांची भेट घेतली. या भेटीमध्ये हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता, व्यापारी, उद्योजग, लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली. या वेळी वेगवेगळ्या बैठकांमध्ये त्यांनी उपस्थितांना विविध विषयांची अवगत केले.

नेवासा येथे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता, उद्योजक आणि धर्मप्रेमी यांच्या बैठका !

बैठकीला उपस्थित धर्मप्रेमी

नेवासा बुद्रुक येथील प्रभु श्रीरामाच्या मंदिरात नेवासा येथील हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी मुलांची बैठक पार पडली. हिंदु धर्मावरील आघात, भारतभरात होत असलेले काही सकारात्मक पालट यांविषयी श्री. सुनील घनवट यांनी सविस्तर चर्चा केली. हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेची मागणी केली. ‘सर्व सिद्धता आणि प्रसार करण्यास ते सिद्ध आहेत’, असेही त्यांनी सांगितले.

दरेवाडी आणि वाळुंज, तसेच बाबुर्डी घुमट येथील धर्मप्रेमी यांची बैठक

बैठकीला उपस्थित धर्माभिमानी युवक
बैठकीला उपस्थित धर्माभिमानी युवक

दरेवाडी आणि वाळुंज, तसेच बाबुर्डी घुमट येथील धर्मप्रेमी यांची बैठक पार पडली.  या वेळी श्री. सुनील घनवट यांनी हिंदूंवर होणारे आघात सांगून हिंदु राष्ट्राच्या दिशेने होत असलेले प्रयत्न सांगितले. दरेवाडीच्या परिसरातील ११ गावांमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यास धर्मप्रेमींनी सुचवले. तसेच मासातून एक वेळ नगर येथील आंदोलनासाठी येण्याची सिद्धता दर्शवली.

आपल्यासारखे सर्वस्वाचा त्याग करून धर्मकार्य करणारे अल्प असतात !  – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके

आमदार गणेश लंके (डावीकडून) यांच्याकडून श्री. सुनील घनवट यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्यासारखे सर्वस्वाचा त्याग करून धर्मकार्य करणारे अल्प असतात अशा  शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी समितीच्या कार्याचा गौरव केला. अतीव्यस्तता असूनही आमदार नीलेश लंके यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना वेळ दिला. तुळजापूर देवस्थानातील गैरप्रकार आणि भ्रष्टाचार, तसेच निरनिराळ्या गडदुर्गांवर धर्मांधांनी केलेले अतिक्रमण याविषयांवर सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात आमदार नीलेश लंके यांनी ‘अधिवेशनात विषय पुढे पाठवू’, असे आश्वासन दिले.

पुनदगाव (नेवासा) येथे आयोजित केली बैठक !

मंदिरातील बैठकीला उपस्थित भाविक

धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि काळानुसार हिंदु संघटनाचे महत्त्व या विषयावर श्री. सुनील घनवट यांनी विषय सांगितला. उपस्थितांचा पुष्कळ चांगला प्रतिसाद होता.
एक पाक्षिक धर्मशिक्षणवर्ग चालू करणार असून गावात एक हिंदु राष्ट्र-जागृती सभा गावात घेणार.

अधिवक्ता बैठक

अधिवक्ते विषय समजून घेतांना

शेवगाव येथे अधिवक्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत श्री. सुनील घनवट यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे कार्य या दोन्ही विषयांच्या संदर्भातील व्हिडिओ दाखवला, संघटनात्मक कार्य सांगितले. या वेळी सगळ्यांचा चांगला सहभाग होता. प्रांतीय अधिवेशनाला येण्याची सिद्धता सर्वांनी दाखवली. ‘मासातून दोनदा धर्मशिक्षण बैठक घ्यावी’, अशी मागणी आली.

‘हलाल सर्टीफिकेट’च्या विरोधात नगर येथील उद्योजक एकवटले!

हलाल सर्टिफिकेट विषय समजून घेतांना व्यापारी आणि शिक्षक छायाचित्रात डावीकडे कु. प्रतिक्षा कोरगावकर

श्री राममंदिर, पाथर्डी येथे ‘हलाल सर्टिफिकेट’ या विषयावर गावातील मान्यवर व्यापारी आणि शिक्षक अशांची बैठक झाली. सगळ्यांचा चांगला प्रतिसाद होता. बैठकीला उपस्थित बरेच जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. मासातून एकदा धर्मशिक्षणवर्गाची मागणी त्यांनी केली. या बैठकीला २१ हून अधिक जण उपस्थित होते.

हलाल सर्टिफिकेट विषय समजून घेतांना उद्योजग

अशीच एक बैठक नगर शहरात विठ्ठल मंदिर येथे पार पडली. नगर शहरातील मान्यवर उद्योजक या बैठकीला उपस्थित होते. हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात संघटित व्हायचे, असे सर्वानुमते ठरले.

श्रीरामपूर येथील ‘अपूर्वा हॉल’मध्ये हलाल विषयावर बैठक

बैठकीला उपस्थित धर्मप्रेमी

वेगवेगळ्या जिहादविषयी प्रारंभी माहिती सांगून ‘हलाल जिहाद’चे षड्यंत्र किती भयानक आहे, याविषयी श्री. घनवट यांनी पुरावे दाखवत माहिती सांगितली.
‘हलालच्या संदर्भात श्रीरामपूर येथील सर्व हिंदु व्यावसायिकांची मोठ्या बैठकीच्या दृष्टीने नियोजन करणार’, असे उपस्थित धर्मप्रेमींनी सांगितले, तसेच ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नियोजन श्रीरामपूर येथे करणार’, असे सांगितले.

धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमी महिलांची बैठक !

धर्मप्रेमी महिलांच्या बैठकीत बोलतांना श्री. घनवट

नगर येथील धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमी महिलांची एकत्रित बैठक झाली. महिलांचा पुष्कळ उत्स्फूर्त प्रतिसाद होता. ‘राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी वेळ दिलाच पाहिजे’, असे त्यांनी मत व्यक्त केले. गडदुर्ग संवर्धन, हिंदु धर्मावरील आघात आणि ते रोखण्यासाठी हिंदूंनी करावयाचे प्रयत्न या विषयावर चर्चा झाली. बैठकीला महिलांची अधिक उपस्थिती होती.

नगर येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. नरेंद्र फिरोदिया यांची अनौपचारिक भेट !

श्री. नरेंद्र फिरोदिया (मध्यभागी) यांना पंचांग भेट देतांना सुनील घनवट (डावीकडे) आणि उजवीकडे श्री. संतोष गवळी

नगर येथील प्रसिद्ध उद्योजक, तसेच नगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. नरेंद्र फिरोदिया यांची अनौपचारिक भेट झाली. या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्या. गोवा येथे होणारे दहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे निमंत्रण श्री. सुनील घनवट यांनी नरेंद्र फिरोदिया यांना दिली.