धार्मिक कार्यक्रमांसाठी देशपातळीवर नियमावली करायला हवी ! – रा.स्व. संघाची मागणी
पुणे – धर्मावरून चालू असलेले राजकारण चुकीचे असून प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाने घटनेच्या अधीन राहून नियमांचे पालन करावे. धार्मिक रितीरिवाज, परंपरा, अभिव्यक्तींसाठी देशपातळीवर नियमावली करायला हवी. त्यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण करण्याच्या प्रकारांना आळा बसेल आणि सामाजिक ऐक्यही अबाधित राहील, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय समितीचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. मशिदीवरील भोंगे हटवण्यावरून चालू असलेल्या राजकारणावर २० एप्रिल या दिवशी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.