दैवी बालकांवर वाईट शक्ती गर्भावस्थेपासून किंवा बालके जन्माला आल्यावरही करत असलेली आक्रमणे !
२१.४.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘दैवी बालसाधकांमध्ये जाणवलेली सेवेची तीव्र तळमळ आणि त्यांचा इंद्रियनिग्रह !’ हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/572668.html
२. अनिष्ट शक्तींची दैवी बालकांवर होणारी आक्रमणे आणि त्याचे परिणाम !
२ अ. अनिष्ट शक्ती दैवी बालकांवर गर्भावस्थेत किंवा जन्मानंतर आक्रमणे करून त्यांची प्राणशक्ती न्यून करत असणे : ‘एका दैवी बालिकेला प्राणशक्ती न्यून होण्याचा आध्यात्मिक स्वरूपाचा त्रास आहे आणि त्यासाठी ती नामजपादी आध्यात्मिक उपायही करत आहे’, असे मला समजले. ‘दैवी बालकांच्या जीवनाचा मूळ उद्देश ‘व्यापक स्तरावर धर्मकार्य करणे’ हा असतो. अनेक वेळा अनिष्ट शक्ती अशा दैवी बालकांवर गर्भावस्थेतच सूक्ष्म स्तरावर आक्रमण करून त्यांची प्राणशक्ती न्यून करतात. त्यामुळे जन्माच्या वेळी किंवा काही काळानंतर त्यांची प्राणशक्ती न्यून झाल्यामुळे त्यांना त्रास होतो. त्यामुळे ‘भविष्यात त्यांना सत्सेवा करण्यात अडथळे निर्माण होतात’, असे मला माझ्या संशोधनात आढळून आले आहे.
२ आ. अनिष्ट शक्तींच्या आक्रमणामुळे दैवी बालकांना होणारे त्रास ! : दैवी बालकांना जन्मतःच प्राणशक्ती न्यून असल्यामुळे त्रास होत असेल, तर ते आपण सूक्ष्मातून समजू शकतो; पण त्याची काही स्थूल लक्षणे मी पाहिली आहेत, जसे जन्मानंतर लगेच श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यामुळे काही काळ त्यांना ‘इनक्युबेटर’(नवजात बालकाला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी उबदार वातावरण असलेली काचेची पेटी) मध्ये ठेवावे लागणे, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही पुष्कळ प्रमाणात रडणे, रात्री न झोपणे किंवा काहीही न खाणे, त्यांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, योग्य प्रमाणात जेवत असूनही अपेक्षित शारीरिक वाढ न होणे, थोडा वेळ खेळल्यानंतर पाय दुखणे, सातत्याने श्वास किंवा कफ यांच्याशी संबंधित त्रास होणे इत्यादी.
२ इ. त्रास होतांना दैवी बालके संतांकडे न जाणे; मात्र नामजपादी आध्यात्मिक उपाय केल्यावर संतांकडे जाणे : अशा बालकांमध्ये या शारीरिक त्रासांव्यतिरिक्त कधीकधी इतर काही त्रासही आढळून आले आहेत. कधीकधी त्रासाच्या तीव्रतेमुळे अशी दैवी बालके संतांकडे जात नाहीत. संतांनी त्यांना घेताच त्यांच्यातील चैतन्य सहन न झाल्याने ती बालके पुष्कळ रडू लागतात; पण त्यांच्यावर नामजपादी आध्यात्मिक उपाय केल्यानंतर ती सहजतेने संतांकडे जातात, त्यांच्याशी गप्पा मारतात किंवा त्यांच्याशी खेळतात. अशी अनुभूती मला ५ दैवी बालकांच्या संदर्भात आली आहे.
(क्रमशः)
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासनापीठ (११.१२.२०२१)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
|