दंगा झाल्यास पोलीस ५ मिनिटांत घटनास्थळी पोचतील ! – मुंबई पोलीस
मुंबई – मुंबईमध्ये राज्य राखील पोलीस दलाची ५७ पथके, तर ६ दंगल नियंत्रण पथके पहाऱ्यासाठी ठेवण्यात आली आहेत. मुंबईत दंगा झाल्यास पोलीस ५ मिनिटांत घटनास्थळी पोचतील, असे आश्वासन मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस सतर्क आहेत. शहरातील संवेदनशील आणि असंवेदनशील परिसराची पहाणी करण्यात आली आहे. शहरातील ९४ पोलीस ठाण्यांत १ सहस्र ५०४ स्थाने निवडण्यात आली आहेत. मुंबईमध्ये २४ घंटे ‘पेट्रोलिंग’ करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास घटनास्थळी तातडीने पोचणारी ३३ पथके आहेत.