कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या भाषणाच्या वेळी मंडप कोसळला !
हिंगोली – जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे २१ एप्रिल या दिवशी येथे आले होते. दादाजी भुसे यांचे भाषण चालू असतांना मोठ्या प्रमाणात वारा आल्याने व्यासपिठाच्या डाव्या बाजूला असलेला मंडप कोसळला. सुदैवाने त्या मंडपाखाली कुणीही नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकारामुळे नागरिक घाबरले; परंतु दादाजी भुसे यांनी आवाहन केल्याने नागरिकांनी गदारोळ थांबवला.