भाजपला समर्थन केल्यावरून मुसलमान तरुणांना त्यांच्या धर्मबांधवांकडून मारहाण
मशिदीत नमाजपठण करण्यास रोखत त्यांचा ‘काफीर’ असा उल्लेख !
(काफीर म्हणजे इस्लामला न मानणारे )
गोंडा (उत्तरप्रदेश) – येथील बनकटवा गावामध्ये भाजपचे समर्थन केल्यावर महंमद लुकमान या मुसलमान तरुणाला त्यांच्या धर्मबांधवांनी मशिदीमध्ये नमाजपठण करण्यापासून रोखले. त्याला मशिदीतून बाहेर काढून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. याआधी महंमद लुकमान यांचे भाऊ सरफराज यांनाही मारहाण करण्यात आली.
लुकमान यांनी सांगितले, ‘मी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे समर्थन केले होत. यामुळे माझे धर्मबांधव नाराज होते. माझा भाऊ सरफराज जेव्हा मशिदीमध्ये नमाजपठणासाठी गेला, तेव्हा त्याला रोखण्यात आले. ‘भाजप मशिदींवरील भोंगे काढण्यास सांगत आहे. तुम्ही भाजपमध्ये आहात. तुम्ही नमाजपठणासाठी का येता ? तुमचा कोणताही धर्म नाही. तुम्ही ‘काफिर’ (इस्लामला न मानणारे) आहात’, असे ते म्हणत होते. या वेळी सरफराजला मारहाण करण्यात आली. याची माहिती मला मिळाल्यावर मी तेथे गेला असता मलाही मारहाण करण्यात आली.’ या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
भाजप मुसलमानविरोधी पक्ष आहे, असेच बहुतेक मुसलमानांना वाटते आणि ते भाजपचा विरोध करतात, दुसरीकडे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष हे हिंदुद्वेषी पक्ष असतांना हिंदू त्यांचे समर्थन करतांना आणि त्यांना सत्तेवर बसवतात, हे लक्षात घ्या !