जहाल नक्षलवादी नर्मदा हिचा कर्करोगामुळे भायखळा कारागृहात मृत्यू !
मुंबई – जहाल नक्षलवादी नर्मदा उपाख्य उप्पुगंटी निर्मला हिचा ९ एप्रिल या दिवशी भायखळा कारागृहात मृत्यू झाला. ती कर्करोगाने त्रस्त होती. नर्मदा ही ४२ वर्षे नक्षलवादी चळवळीत सक्रीय होती. ११ जून २०१९ या दिवशी पोलिसांनी तिला अटक केली होती.
जहाल नक्षलवादी नर्मदाचा मुंबईत मृत्यू; गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांनी दिली ‘दंडकारण्य बंद’ची हाकhttps://t.co/VLerur1Zur
नक्षल चळवळीतील सर्वात सक्रिय महिला नेत्या म्हणून ४२ वर्ष चळवळीत कार्यरत असणाऱ्या नर्मदाचा मुंबईत मृत्यू#naxal— LoksattaLive (@LoksattaLive) April 21, 2022
नर्मदा हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ २५ एप्रिल या दिवशी नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथील ‘दंडकारण्य बंद’ची घोषणा केली आहे. ‘उत्पीडित जनता की प्यारी नेत्री कॉमरेड नर्मदा दी अमर रहे ।’ अशी भित्तीपत्रके गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात लावण्यात आली आहेत.