गुजरातमध्ये १०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केलेल्या नरसंहारासाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी क्षमा मागावी !
गुजरातधील नरसंहारात ठार झालेल्या वंशजांची मागणी
नवी देहली – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारताच्या २ दिवसांच्या दौर्यावर आले आहेत. गुजरातमधील म. गांधी यांच्या साबरमती आश्रमाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते देहलीमध्ये जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील पाल-दाढवाव येथे ब्रिटिशांच्या काळात सरकारच्या विरोधात आंदोलन करतांना १ सहस्र २०० भारतीय नागरिकांचा ठार करण्यात आले होते. या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या नरसंहारासाठी पंतप्रधान जॉन्सन यांनी भारताची क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.
१. समाज सुधारक मोतीलाल तेजावत यांच्या नेत्वाखाली २ सहस्र आदिवासींनी ब्रिटिशांकडून होणार्या शोषणाच्या विरोधात आंदोलन करत होते. त्या वेळी मेजर एच्.टी. सुटन याने ब्रिटीश सैनिकांना त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. यावर्षी प्रजासत्ताकदिनाच्या देहली येथील राजपथावरील कार्यक्रमात गुजरातकडून याच नरसंहाराविषयी चित्ररथ बनवण्यात आला होता.
२. मोतिलाल तेजावत यांचे नातू महेंद्र यांनी म्हटले की, ज्या वेळी हा नरसंहार झाला, तेव्हा ब्रिटीश सरकार होते. त्यामुळे जर ब्रिटनचे पंतप्रधान जान्सन यांना वाटते की, निःशस्त्र आदिवासींच्या संदर्भात चुकीचे घडले आहे, तर त्यांनी याविषयी क्षमा मागितली पाहिजे.
संपादकीय भूमिका
केवळ यासाठीच नव्हे, तर ब्रिटिशांनी भारतियांवर जे अनन्वित अत्याचार केले, क्रांतीकारकांना क्रूरपणे ठार मारले आणि त्याही पुढे जाऊन हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी जे सत्ताकाळात प्रयत्न केले, त्यासाठी ब्रिटिशांनी भारतियांची क्षमा मागितली पाहिजे. त्यासाठी भारत सरकारने ब्रिटनवर दबाव आणणे आवश्यक !