वणी येथे शेतकर्‍यांच्या १ कोटी १५ लाखाचा अपहार करणार्‍या व्यापार्‍याला पोलिसांकडून अटक

वणी (यवतमाळ), २० एप्रिल (वार्ता.) – शेतकर्‍यांच्या सोयाबीन विक्रीचे १ कोटी १५ लाख रुपये पळवणार्‍या धीरज सुराणा या व्यापार्‍यास पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली. तो ३ मासांपासून पसार झाला होता.

संपादकीय भूमिका

अशा भ्रष्ट व्यापार्‍यांकडून त्यांची संपत्तीच शासनाधीन करायला हवी !