हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २१ मंदिरांमध्ये करण्यात आली सामूहिक प्रार्थना !
सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियान
वाराणसी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १४ ते १६ एप्रिल या कालावधीत २१ मंदिरांमध्ये सामूहिक साकडे घालण्यात आले. यात उत्तरप्रदेशातील वाराणसी, कानपूर, गाझीपूर आणि भदोही येथील १५, तर बिहारच्या समस्तीपूर, मुझफ्फरपूर, सोनपूर, बेतिया येथील ६ मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवीदेवतांना प्रार्थना करून साकडे घालण्यात आले. या उपक्रमांमध्ये मंदिरांमध्ये उपस्थित सर्व भाविकांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्देश सांगून भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली.
क्षणचित्र : नटवा गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सांगितले की, अशा उपक्रमांना सर्वच लोकांना बोलवा. ते सर्वजण येतील.