ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ‘पॅन कार्ड’वरील जन्मदिनांक आणि शालेय शिक्षणातील जन्मदिनांक यात तफावत का ? – समरजितसिंह घाटगे, भाजप
कागल (जिल्हा कोल्हापूर), २० एप्रिल – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ‘पॅन कार्ड’वरील जन्मदिनांक आणि शालेय शिक्षणातील जन्मदिनांक यांत तफावत आहे. ही तफावत का आहे ? याचे उत्तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी द्यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कागल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ते म्हणाले, ‘‘मला जातीयवादी म्हणणारे हिंदूंची मते मिळवण्यासाठी वाढदिवसाला श्रीरामनवमीचा आधार घेऊन दिशाभूल करणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हेच जातीयवादी आहेत.’’