शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका !
गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्रीही प्रतिवादी
मुंबई – इंडियन बार असोसिएशनने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेत संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी, तसेच दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादिका रश्मी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेत्यांना न्यायालयात झुकते माप दिले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. हा आरोप चुकीचा असल्याचा दावा या याचिकेत केला आहे.