पुढील सुनावणीपर्यंत नील सोमय्या यांना अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !
आय.एन्.एस्. निधी अपहार प्रकरण
मुंबई – आय.एन्.एस्. निधी अपहार प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. २८ एप्रिल या दिवशी होणार्या पुढील सुनावणीपर्यंत नील सोमय्या यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अटक झाल्यास त्यांची ५० सहस्र रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. २५ ते २८ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत त्यांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण कार्यालयात उपस्थिती लावणे बंधनकारक असणार आहे.