जागतिक बँकेची श्रीलंकेला आपत्कालीन साहाय्य करण्याची सिद्धता !
कोलंबो / वाशिंग्टन – जागतिक बँकेने आर्थिक डबघाईत गेलेल्या श्रीलंकेला आपत्कालीन साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली आहे. जागतिक बँकेचे उपाध्यक्ष हार्टविग स्कॅफर यांनी श्रीलंकेचे अर्थमंत्री अली साबरी यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेतल्याचे वृत्त ‘कोलंबो गझेट’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. स्कॅफर म्हणाले की, जागतिक बँक ही श्रीलंकन नागरिकांविषयी चिंतित असून त्यांना आवश्यक औषधे, स्वास्थ्यसंबंधी अन्य वस्तू, खाद्यपदार्थ आणि शैक्षणिक सुविधा देण्यासाठी साहाय्य पुरवणार आहे.
आर्थिक संकटाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना काढण्यावर, तसेच स्थिरता निर्माण होऊन श्रीलंकन नागरिकांचे आर्थिक रक्षण करण्यासाठीच्या विषयांवरही या वेळी चर्चा करण्यात आली.