आता सहनशक्तीचा अंत होत चालला आहे ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवरील आक्रमणांचे प्रकरण
कटिहार (बिहार) – श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर झालेली आक्रमणे ‘गंगा-जमुना तहजीब’चे (मोगलांच्या काळात यमुना आणि गंगा नदीच्या किनारी मुसलमानांची वस्ती वाढल्यानंतर हिंदू आणि मुसलमान यांची एक स्वतंत्र संस्कृती उदयाला आली. त्याला ‘गंगा-जमुना तहजीब’ म्हणतात) दावे करणार्यांना चपराक आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या देशात मोठ्या संख्येने नव्या मशिदी उभ्या राहिल्या. त्याला कुणीही विरोध केला नाही. मुसलमानांची लोकसंख्या अनेक पटींनी वाढली. त्याच वेळी पाकिस्तानात हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. आता तेथील हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आत सहनशक्तीचा अंत होत चालला आहे, असे विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले. श्रीरामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर झालेल्या आक्रमणांविषयी ते बोलत होते.
Union minister Giriraj Singh has alleged that the recent attacks on #RamNavami processions at a number of places across the country flew in the face of the “claims of Ganga Jamuni Tehzeeb” (composite culture of India).https://t.co/6spBe5FG1F
— The New Indian Express (@NewIndianXpress) April 19, 2022
गिरिराज सिंह पुढे म्हणाले की, आता श्रीरामनवमीच्या मिरवणुका पाकिस्तानात बांगलादेश कि अफगाणिस्तानात काढायच्या ? अशी आक्रमणे दुसर्या कोणत्याही धर्माच्या मिरवणुकांवर झाली असती, तर राहुल गांधी यांच्यासारखे नेते रस्त्यांवर उतरले असते.