बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सोडणार नाही ! – भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक, सातारा
सातारा, १९ एप्रिल (वार्ता.) – बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सोडणार नाही. बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी महाराष्ट्रात सर्वांत प्रथम कारवाई केली आहे, असे वक्तव्य सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले. ते अधिवक्ता सदावर्ते यांच्या प्रकरणाचे पुढील अन्वेषण करत आहेत.
बेताल वक्तव्य केल्यामुळे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक करून सातारा न्यायालयात उपस्थित केले होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. त्यांची पाठवणी पुन्हा मुंबई येथील आर्थर रोड कारागृहात केली आहे.