हिंदु जनजागृती समितीच्या हालोंडी आणि नागाव (जिल्हा कोल्हापूर) येथील प्रवचनांसाठी धर्मप्रेमींचा पुढाकार !
कोल्हापूर, १९ एप्रिल (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील हालोंडी आणि नागाव येथे हिंदु जनजागृती समितीचे प्रवचन आयोजित करण्यापासून अन्य सर्व सेवांमध्ये धर्मप्रेमींचा पुढाकार होता. १६ एप्रिल या दिवशी हालोंडी येथे हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी घेतलेल्या प्रवचनासाठी अनेक धर्माभिमानी उपस्थित होते. प्रवचनाच्या प्रारंभी श्री. किरण दुसे यांचा ‘देवस्थान समिती’चे अध्यक्ष श्री. जयप्रकाश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
प्रवचनाच्या पूर्वप्रसारात सौ. वंदना कोळी, सौ. सारिका कोळी, कु. पल्लवी कोळी, सौ. अनिता लोहार, सौ. दीपाली कुंभार, सौ. सुनीता कुंभार यांचा उत्स्फूर्त सहभाग होता, तर श्री. संजय कोळी यांनी पूर्वसिद्धतेसाठी चांगले सहकार्य केले. श्री. जयप्रकाश पाटील आणि श्री. सचिन कोळी यांनीही आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
१७ एप्रिल या दिवशी श्री. किरण दुसे यांनी नागाव येथील श्री खणाईदेवी मंदिराच्या सभागृहात प्रवचन घेतले. प्रारंभी श्री. किरण दुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
विशेष
१. मंदिराच्या सभागृहांमध्ये २ दिवस क्रांतीकारकांविषयी माहिती देणारे आणि काश्मिरी हिंदूंच्या संदर्भातील सत्यता दर्शवणारे ‘फॅक्ट’चे प्रदर्शन युवकांनी उत्स्फूर्तपणे लावले.
२. धर्मप्रेमी श्री. महेश सावंत यांनी सभेच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
३. हिंदू दबाव गटातील युवकांच्या पुढाकाराने हे प्रवचन घेण्यात आले.