महावितरणच्या धर्मांध अधिकाऱ्याला लाच स्वीकारतांना पकडले !
|
सोलापूर – साहाय्यक विद्युत् निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले फैजूलअली मेहबूब मुल्ला याला १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. साहाय्यक विद्युत् निरीक्षक या पदावर अनेक वर्षे काम केलेल्या मुल्लाची मालमत्ताही पडताळली जाणार आहे. सध्या त्याच्याकडे कोल्हापूर आणि सोलापूर या २ जिल्ह्यांचा पदभार असल्याने तो काही दिवस कोल्हापूर येथे, तर काही दिवस सोलापूर येथे काम करत असे. (साहाय्यक विद्युत् निरीक्षक मुल्ला याची सखोल चौकशी करून अजून किती जणांकडून लाच घेतली आहे, याचेही अन्वेषण करून त्याच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)
महावितरणच्या माध्यमातून विजेच्या दुरुस्तीसह अन्य कामांसाठी खासगी तत्त्वावर कंत्राटदार नेमले जातात. त्यासाठी महावितरणकडून २ परवाने घेणे आवश्यक असते. प्रारंभी विद्युत् पर्यवेक्षक म्हणून परवाना मिळाल्यानंतर काही दिवसांनी संबंधित व्यक्तीला महावितरणचा अधीकृत ठेकेदार म्हणून परवाना दिला जातो. ते दोन्ही परवाने देण्यासाठी कोल्हापूर आणि सोलापूर येथील दोन्ही कार्यालयांचा पदभार मुल्ला याच्याकडे आहे. तक्रारदाराला त्याने यापूर्वीच पहिला परवाना दिला होता आणि आता नवीन परवाना देतांना दोन्हींचे मिळून एकूण ३२ सहस्र रुपयांची लाच मागितली. त्या लाचेतील पहिला हप्ता घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुल्ला याला पकडले.