(म्हणे) ‘मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटली, तर मंदिरासमोर बसून भोंग्यांवरून कुराण पठण करू !’
समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबीना खानम यांचे हिरवे फुत्कार !
|
अलीगड (उत्तरप्रदेश) – मुसलमानांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटल्यास आम्हालाही मंदिरांसमोर बसून भोंग्यांवर कुराणाचे पठण करावे लागेल आणि त्यात आम्ही महिला आघाडीवर असू, अशी चेतावणी येथील समाजवादी पक्षाच्या नेत्या रूबीना खानम यांनी दिली आहे. येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी २१ चौकांमध्ये ध्वनीक्षेपकांवरून हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर खानम यांनी हे विधान केले आहे.
Amid loudspeaker row SP leader threatens ‘will recite Quran at temples’; booked https://t.co/jPGmqPXXMt
— Republic (@republic) April 19, 2022
१. खानम पुढे म्हणाल्या की, रमझानचा पवित्र मास चालू असतांना आम्हाला आमच्या धार्मिक परंपरांचे पालन करू द्या. (हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदींसमोरून जात असतांना हिंदूंना त्यांच्या परंपरांचे पालन करू देण्यात का येत नाही ? ‘या मिरवणुकांवर मशिदींवरून आक्रमण का केली जातात ?’, याचे उत्तर खानम देतील का ? – संपादक) त्यात ज्याप्रकारे अडचणी निर्माण केल्या जात आहेत ते चुकीचे आहे. जर मुसलमानांना लक्ष्य करून मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा प्रयत्न केला, तर शेकडो मुसलमान महिला याविरुद्ध आंदोलन करतील, अशी धमकीही त्यांनी दिली.
२. भाजपचे सरकार मुसलमान आणि हिंदु यांना आपसांत भांडण करण्यासाठी उद्युक्त करत आहे. हे तेच सरकार आहे, जे स्वतःच्या श्रद्धा आणि आचरण विसरले आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.