(म्हणे) ‘भारतात हिंदूंकडून मुसलमानांवर आक्रमणे !’ – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतातील हिंसाचारांच्या घटनांवरून आरोप
इस्लामाबाद (पाकिस्तान) – राजधानी देहलीसमवेत भारतातील काही शहरांमध्ये हिंदूंकडून मुसलमानांवर आक्रमणे करण्यात येत आहेत. त्यामुळे मानवाधिकाराच्या उल्लंघनासाठी जगाने भारताला दोषी ठरवावे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत गुढीपाडवा, श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या मिरवणुकांवर झालेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पाकने हे विधान केले आहे.
भारत में रामनवमी और हनुमान जयंती के अवसर पर देश के कई हिस्सों से हिंसा की खबरें सामने आई हैं. जिसपर अब पाकिस्तान ने अपना रिएक्शन दिया है. #HanumanJayanti #jahagirpuri #jahagirpuriViolence #Pakistan https://t.co/K7rylrlHjn
— ABP News (@ABPNews) April 19, 2022
पाकने म्हटले आहे की, देहलीच्या जहांगीरपुरीमधील घटनेमध्ये मशिदीवर भगवा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला गेला आणि आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. (ही अफवा होती आणि हे धादांत खोटे वृत्त होते, असे देहलीच्या आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तरीही पाक या अफवेचे भांडवल करत आहे ! – संपादक) मुसलमान इफ्तार पार्टीसाठी जात असतांना हिंदूंनी त्यांना शस्त्रे दाखवली. या घटना भारतातील सरकारांची मुसलमानांच्या विरोधातील भूमिका कशी आहे, हे दाखवतात.
दिल्ली दंगे पर शहबाज सरकार के जहरीले बोल, मुस्लिमों पर हमले कर रहे हिंदू, दुनिया दे दखलhttps://t.co/gAp679dcNt via @NavbharatTimes
— NBT Hindi News (@NavbharatTimes) April 19, 2022
या घटनांमुळे भारत वेगाने हिंदु राष्ट्राच्या दिशेने जात आहे. मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांत मुसलमानांची घरे पाडण्यात आली. या राज्यांतील घटना भारत सरकार आणि समाज यांत हिंदुत्वाची विचारधारा किती रुजली आहे, हे दाखवते. दुसरीकडे भारतात कथित दंगेखोर म्हणून मुसलमानांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.
संपादकीय भूमिका
|