धर्मकार्यासाठी मिळालेल्या अर्पणाचा अपहार करणाऱ्यांपासून सावध रहावे, तसेच असे प्रकार त्वरित हिंदु जनजागृती समितीला कळवावेत !
हिंदु जनजागृती समितीचे अर्पणदात्यांना आवाहन
हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्यासाठी अर्पण म्हणून सांगली जिल्ह्यातील एका धर्मप्रेमीने उरण-इस्लामपूर येथील संतोष विठ्ठल कुंभार यांच्याकडे ५ सहस्र ५१ रुपये दिले होते. संतोष कुंभार यांनी या अर्पण निधीपैकी केवळ १०१ रुपये समितीकडे जमा करून उर्वरित निधीचा अपहार केला असल्याचे कळते.
याशिवाय संतोष कुंभार यांनी समितीच्या कार्यासाठी धान्य हवे, असे सांगून काही जणांकडून ते घेतले आणि प्रत्यक्षात ते स्वत:कडे ठेवल्याचे काही जणांच्या तक्रारीतून लक्षात आले आहे. संतोष कुंभार यांच्याविषयी अशाप्रकारचे अनुभव कुणाला आले असल्यास त्यांनी त्याविषयीची सविस्तर माहिती खालील पत्त्यावर कळवावी.
अर्पणदात्यांना विनंती !
हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्याचा अपलाभ घेण्यासाठी काही लोक समितीच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. ते अर्पणदात्यांशी ओळख आणि जवळीक करून त्याचा दुरुपयोग करत असतात. समितीच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी अर्पणदात्यांनी त्यांच्याकडे अर्पण मागण्यासाठी येणाऱ्यांकडे अर्पणाची छापील पावतीपुस्तके आहेत कि नाहीत, हे पाहून अर्पण द्यावे अन् त्यांच्याकडून अर्पणाची पावती अवश्य मागून घ्यावी. अर्पण मागण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीविषयी काही संशयास्पद आढळल्यास आपल्याला परिचित असलेल्या समितीच्या स्थानिक समन्वयकांशी संपर्क साधावा.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचनाधर्मकार्यासाठी धर्मप्रेमींनी अर्पण दिल्यानंतर त्यांना त्याची रितसर पावती द्यावी, तसेच समितीने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीचे तंतोतंत पालन करावे. धर्मप्रेमींनी धर्मकार्यासाठी अर्पण दिलेला निधी अथवा वस्तू यांचा कुणी अपवापर करत असल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी खालील पत्त्यावर कळवावेत. श्री. गौतम गडेकर, व्यवस्थापकीय विश्वस्त, हिंदु जनजागृती समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१ संपर्क क्रमांक : ७७३८२३३३३३ संगणकीय पत्ता : contact@hindujagruti.org |