शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून खलिस्तानीवाद्यांचा देश अस्थिर करण्याचा मोठा डाव ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय
खलिस्तानी चळवळीने चीन, पाकिस्तान आणि इस्लामी आतंकवादी यांच्याशी हात मिळवला असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती आहे. भारताच्या इतिहासात शिखांचे मोठे योगदान आहे; मात्र शेतकरी आंदोलनाच्या माध्यमांतून शिखांना उतरवून सरकारने त्यांच्यावर गोळीबार करावा, असे वातावरण अनेकदा खलिस्तानवाद्यांनी निर्माण केले; मात्र सरकारने बळाचा वापर केला नाही. जर तसे झाले असते, तर त्या माध्यमातून देश अस्थिर करण्याचा मोठा डाव होता.