अंगारकीच्या निमित्ताने गणपतीपुळे येथे विनामूल्य ‘ब्रेक डाऊन सर्व्हिस’ !
कोल्हापूर, १८ एप्रिल (वार्ता.) – कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल एज्युकेशन आणि रिसर्च फाऊंडेशन, तसेच त्यांचे सहकारी यांच्या वतीने अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे विनामूल्य ‘ब्रेक डाऊन सर्व्हिस’ देण्याचा निर्णय घेतला आहे. १९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ पर्यंत ही सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. अमोल सरनाईक यांनी दिली.
या संदर्भात श्री. निशिकांत आंब्रे म्हणाले, ‘‘जोतिबा, श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दुचाकीवरून जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे चैत्र मासात येणाऱ्या जोतिबा यात्रेसमवेत आम्ही अंगारकीसाठीही विनामूल्य दुचाकी दुरुस्तीची सेवा देत आहोत. गेल्या २० वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवत असून यात सर्वश्री विजय पाटील, संदीप रसाळे, रमेश बावले, नवदीप गाजरे, अमित चिले यांसह अन्यांचा सहभाग आहे.
गणपतीपुळे येथे हॉटेल विसावा, चाफे तिठ्ठा आणि गणपतीपुळे वाहनतळ येथे ही सेवा मिळेल. अधिक माहितीसाठी विजय पाटील यांना ९४२२४२१५४५ या क्रमांकावर संपर्क साधवा.’’