(म्हणे) ‘मनसेने समयमर्यादा दिली, तरी मशिदींवरून भोंगे उतरवणार नाही !’
सर्व भोंगे अधिकृत करण्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र !
|
मुंबई – मशिदींवरील भोंग्यांच्या सूत्रावरून मनसे राजकारण करत आहे. मनसेने ३ मेची समयमर्यादा दिली, तरी मशिदींवरून भोंगे उतरवणार नाही, असे मुजार वक्तव्य रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी केले आहे. नुरी म्हणाले, ‘‘आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांची १७ एप्रिल या दिवशी भेट घेऊन भोंग्यांविषयीची अनुमती देण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून भोंग्यांवरून नमाजपठण केले जात आहे; परंतु हा विषय आताच का समोर आला ? मशिदींकडून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पूर्णपणे पालन केले जाईल. मुंबईतील प्रत्येक मशिदीवर ध्वनीवर्धक लावण्याची अनुमती आहे. ज्या मशिदीकडे ध्वनीवर्धकाची अनुमती नाही, त्याची अनुमती घेतली जाईल आणि त्यानुसार नमाजपठण केले जाईल.’’
Raza Academy : रझा अकादमीने म्हटले, मशिदीवरील लाऊडस्पीकर काढणार नाही, पण…https://t.co/7RbjDjxVxR #mns
— ABP माझा (@abpmajhatv) April 18, 2022
आज मुंबईच्या पोलीस आयुक्तांना ‘ऑल इंडिया सुन्नी जमायतुउल उलमा’कडून पत्र पाठवून भोंग्यांसाठी अनुमती मागण्यात आली, असेही नुरी म्हणाले.