भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ !
नवी देहली – भारतात १७ एप्रिल या दिवशी २ सहस्र १८३ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. आदल्या दिवशी हा आकडा १ सहस्र १५० होता. यामध्ये केवळ देहलीतील संसर्ग झालेल्यांचा आकडा हा ५१३ असून ३ मार्च २०२२ नंतरचा राजधानीतील हा सर्वाधिक आकडा आहे. देशभरात १७ एप्रिल या दिवशी २१४ नागरिक कोरोनाचे बळी ठरले असून यांपैकी २१३ जण हे केवळ केरळ राज्यातीलच आहेत. आतापर्यंत एकूण ५ लाख २१ सहस्र ९६५ भारतीय नागरिक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.
Corona India Update: देशात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ, केंद्राने 5 राज्यांना लिहिलं पत्र https://t.co/PtaEj5mbza
— भारत लाइव्ह मीडिया (@BLaevh) April 12, 2022