आर्थिक डबघाईला आलेल्या श्रीलंकेत नव्या मंत्रीमंडळाची स्थापना !

कोलंबो (श्रीलंका) – गेल्या काही आठवड्यांपासून भारताशेजारील देश श्रीलंकेवर भीषण संकट ओढावले आहे. तेथील सत्तेवर असलेल्या राजपक्षे परिवाराच्या चुकीच्या धोरणांमुळे श्रीलंका आर्थिक डबघाईला आली. यामुळे संतप्त जनतेकडून हिंसक आंदोलने करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून काही दिवसांपूर्वी तेथील सरकार विसर्जित करण्यात आले होते. आता १७ मंत्र्यांसह नव्या मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली. नव्या व्यवस्थेनुसार गोतबाया राजपक्षे हेच राष्ट्रपती असून त्यांचे मोठे भाऊ महिंदा राजपक्षे पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्याखेरीज राजपक्षे परिवारातील अन्य कुणालाच या सरकारमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.